म. ना. लोही - लेख सूची

जाती आणि आडनावे

नोव्हेंबर २००० चा आजचा सुधारक अनेक विवाद्य विषयांनी रंगलेला आहे. ‘जातींचा उगम’, ‘आडनाव हवेच कशाला?’ हे सांस्कृतिक विषयांवरील लेख, ‘सखोल लोकशाही’, ‘दुर्दशा’, ‘फडके’ आदी राजकीय व आर्थिक विषयांवरील लेख विचारपरिप्लुत, वाचकांच्या डोळ्यांत अंजन घालणारे आहेत. त्यांचा परामर्श दोन भागात घ्यावा लागेल. ‘गांवगाडा’ हे त्रिंबक नारायण आत्रे यांचे पुस्तक १९१५ साली म्हणजे पंचाऐंशी वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाले. …

विद्वेषाने विद्वेष वाढतो

‘आजचा सुधारक’च्या जून २००० च्या अंकात नागपूरच्या दीक्षाभूमीवरील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याच्या शुद्धीकरणाच्या संदर्भात दोन पत्रे प्रसिद्ध झाली आहेत. माझी ही प्रतिक्रिया. विसाव्या शतकात भारतात (की हिंदुस्थानात?) लो. टिळक, गोखले, म. गांधी, पं. नेहरू स्वा. सावरकर, भारतरत्न आंबेडकर आदी थोर व्यक्ती होऊन गेल्या. त्यांच्याविषयी सर्व भारतीयांना (केवळ हिंदूंनाच नव्हे) पुरेसा आदरभाव असणे अपेक्षित आहे. डॉ. बाबासाहेब …

स्वदेशी चळवळ : एक मुक्त चिंतन

मे १९९९ च्या अंकात श्री. र. वि. पांढरे यांचा स्वदेशीची चळवळ हा लेख वाचण्यात आला. स्वदेशीच्या चळवळी बद्दल मतभेद असू शकतात. पण श्री. पांढरे या चळवळीचा विचार ज्या पद्धतीने मांडतात ती पद्धत वैचारिक लेखाला अंशोभनीय आहे. लेखकाचा रोष राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर असल्याचे दिसून येते. वास्तविक संघाचा हिंदुत्ववाद कधीच आक्रमक नव्हता. त्याला एवढेच अभिप्रेत होते आणि …

संभ्रमात टाकणारे इतिहास-संशोधन

‘श्रीरामाची अयोध्या उत्तरप्रदेशात नसून अफगाणिस्थानात असावी’ असा दावा बंगलोर येथील इन्डियन इन्स्टिस्टूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सचे डॉ. राजेश कोछर यांनी केल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इन्डियाच्या दि. २० ऑक्टोबर १९९२ च्या अंकात प्रसिद्ध झाले आहे. दुसरी अशाच प्रकारची बातमी नागपूरच्या हितवाद च्या दि. २३ नोव्हेंबर १९९२ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. त्या बातमीत म्हटले आहे की, डॉ. आर.के. …

उपेक्षा लोकहितवादींची

महाराष्ट्रात सामाजिक प्रबोधनाचा प्रारंभ बाळशास्त्री जांभेकरांच्या ‘दर्पण’ (इ.स. १८३२) या साप्ताहिकाच्या आरंभापासून झाला असे म्हणता येईल. परंतु सामाजिक सुधारणेला पोषक व प्रेरक असे साहित्य ‘प्रभाकर’ पत्रातून १८४६ सालापासून ‘शतपत्रां’च्या रूपाने महाराष्ट्राला दिले ते लोकहितवादी यांनीच. त्याच वर्षी पुण्यात पहिली मुलींची शाळाकाढून म. जोतिबा फुले यांनी प्रत्यक्षात सामाजिक परिवर्तनाचा पाया घातला. पेशवाईच्या अस्तानंतर केवळ तीस वर्षांच्या …